Breaking News

खामगाव-सांगोला महामार्गावर पडले खड्डे


काम पूर्ण होण्या पूर्वीच
अनेक ठिकाणी रस्ता उखडला तर पुलावरील जम्पिंगमुळे अपघाताची शक्यता

गौतम बचुटे । केज 

खामगाव सांगोला महार्गावर केज ते साळेगाव दरम्यान खड्डे पडले आहेत तसेच अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहेत त्याच बरोबर अनेक पुलांचे कामे निकृष्ट दर्जाजे झालेले आहेत. त्यामुळे भरधाव वेगातील वाहानांना अपघात होण्याची शक्यता आहे.

खामगाव-सांगोला महामार्ग क्र. ५६८-सी या सुमारे ४५० किमी महामार्गावर केज कळंब दरम्यान काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. त्याच बरोबर पूलाचे कठडे अपूर्ण आहेत. पुलाच्या ठिकाणी रस्ता व काँक्रीट उखडून खड्डे पडलेले आहेत तर पुलावर जम्पिंग असल्यामुळे भरधाव वेगातील वाहने अचानक त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात व जिवितहानी होण्याची शक्यता आहे. या विषयी अनेकवेळा प्रसिद्धी माध्यमातून वृत्त प्रकाशित झालेले आहे तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दखल घेतली नाही.

साळेगाव नजीक अपूर्ण दुभाजक व नाली बांधकाम केलेले नाही. तसेच साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. 

ओएफसी केबल रस्त्याच्या जवळ टाकले असताना दबई न केल्यामुळे रस्ता कमकुवत झाला असून पावसाळ्यात रस्ता खचन्याची शक्यता आहे. 

अनेक ठिकाणी अप्रोच रोड व पुलाचे कामे केलेली नाहीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी वळण रस्ता व्यवस्थित नाही. सूचना फलक व व्यवस्थित बॅरिकेटिंग आणि सिग्नल व्यवस्था नाही.
No comments