Breaking News

"रजाकारी" लाॅकडाऊन तात्काळ माघे घ्या अन्यथा सर्व व्यापाऱ्यांना घेऊन वंचित दोन दिवसात रस्त्यावर उतरणार-प्रा.शिवराज बांगर पाटील


बीड : गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्हा पूर्ण लाॅकडाऊन  केलेला आहे पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याला विरोध म्हणून निदर्शने करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा  संपूर्ण जिल्ह्यामधे निवेदन देऊन जाचक आणि जुलमी लॉक डाऊन तात्काळ मागे घ्या असे आवाहन करण्यात आले. 

जिल्हा प्रशासनाने लोकभावना लक्षात घेऊन हे रजाकारी लॉकडाऊन अंशता नाही तर पूर्णपणे मागे घ्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील सर्व शेतकरी,  मजुर, व्यापारी, क्लासेस चालक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते अभ्यासिका चालक, यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर पाटील, गणेश खेमाडे, प्रा.राजेंद्र कोरडे, किरण वाघमारे, आजय सरवदे, लखन जोगदंड उमेश तुळवे, सुमित उजगरे अनिकेत डोळस ई. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.No comments