Breaking News

कटचिंचोलीत रस्ता कामाचा शुभारंभ ; सभापती सविताताई मस्के यांनी उपलब्ध करुन दिला निधी

गेवराई :  तालुक्यातील कटचिंचोली येथे बीएम कार्पेट रस्ता कामाचा शुभारंभ बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा नेते बाळासाहेब मस्के यांच्या शुभ हस्ते रविवारी करण्यात आला. या रस्ता कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली या गटाच्या सदस्या तथा बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी त्यांच्या विकास निधीतून निधी उपलब्ध करुन दिला.

      गेवराई तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटात या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु आहेत. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते, जिल्हा परिषदेच्या विशेष फंडातून सिमेंट तसेच डांबरी रस्ते, स्मशानभुमी, पथदिवे, नवीन शाळा वर्गखोल्या, पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्ती तसेच नवीन इमारती, हातपंप, रेवकी-देवकी दरम्यान नदीवरील पुल, सिमेंट बंधारे, पाणी प्रश्न आदी कामे मोठ्या प्रमाणावर करुन त्यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. शिवाय जिल्हा परिषदेत आपल्या कर्तत्वाचा ठसा उमटवला आहे. दरम्यान तालुक्यातील कटचिंचोली येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कटचिंचोली ते दैठणकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करून 8 लक्ष 25 हजार रुपये रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला कटचिंचोली ते दैठणकडे 400 मीटर बीएम कार्पेट रस्ता तयार करण्यात येणार आहे. 

या रस्ता कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी युवा नेते तथा बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान सदरील रस्त्याचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना बाळासाहेब मस्के यांनी यावेळी बोलताना संबंधितांना दिल्या. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बी.एम.प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के म्हणाले. यावेळी कटचिंचोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments