Breaking News

बँकेला गहाण खत केलेली जमीन परस्परविक्री केली म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्यांची पत्नी व त्यांच्यासह अन्य एकावर फसवणुकीचा गुन्हा

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील एका माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या पत्नी व यांनी बँकेकडे ऊस वाहतुकीसाठी घेतलेल्या कर्जापोटी तारण ठेवलेली जमीन परस्पर विक्री केली. म्हणून बँकेने माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आणि एकावर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. 

या बाबतची माहिती अशी की, युसुफवडगाव ता. केज येथील बीड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य महारुद्र लामतुरे यांच्या पत्नी सौ. सुशीला लामतुरे यांनी सन २०१५ मध्ये प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. कळंब मुख्य शाखा कळंब या बँकेकडुन ऊस वाहतुक ठेकेदारी करिता मुदत कर्ज म्हणुन १० लाख रू. घेतले होते. कर्जास तारण देवुन त्यांच्या नावारील असलेली शेत सर्वे नं. १३१ मधील जमीन तारण देवुन गहाण खताद्वारे ७/१२ पत्रकावर बँकेचे कर्ज घेतले. या बाबत बोजा नोंद असताना स्व:ताचे आथिर्क फायद्यासाठी बँकेची फसवणुक करण्याचे उद्देशाने बेकायदेशीरपणे बोजा विरहीत खोटा ७/१२ तयार करून खरेदी खत करून बँकेकडे गहाण ठेवलेल्या सर्वे नं १६० मधील ३ हे ५५ आर जमीन शांतलिंग विश्वनाथ लामतुरे यांना जमीन विक्री केली. शातलींग लामतुरे यास या जमीनीचा खोटे ७/१२ तयार केलेले माहीत असतांना व त्यावर कर्ज आहे. हे सर्व माहित असतांना त्याने जमीन खरेदी केली. तसेच महारुद्र लामतुरे यांनी साक्षीदार म्हणुन सह्या करून संगणमताने बँकेचीफसवणुक केली. म्हणुन बँकेचे वसुली अधिकारी संतोष कचरू गायकवाड यांनी दिनांक ३० मार्च मंगळवार रोजी केज पोलीस स्टेशनला सौ. सुशिला महारुद्र लामतुरे, महारुद्र साखहरी लामतुरे व शातलींग विश्वनाथ लामतुरे यांच्या विरोधात तक्रार दिली असून त्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात १४३/२०२१ भा दं वि ४२० व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान एका माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून जमीनीवर कर्जाचा बोजा असतानाही बनावट ७/१२ देऊन खरेदी-विक्रीस मदत करणारे तलाठी, मंडळ अधिकारी व दुय्यम निबंधक यांचीही चौकशी व्हायला हवी. अशी चर्चा सुरू आहे.

No comments