Breaking News

जवळा ते चौसाळा बोगस रस्ताकाम करणाऱ्या कंत्राटदारासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा !


नाळवंडी, जरूड, कुटेवाडी, बोरफडी, भवानवाडी येथील शेकडो नागरिकांची जिल्हाधिकारी यांना निवेदन

सोमवारपर्यंत कारवाई करा अन्यथा गावोगाव करण्यात येणार उपोषण - गुंदेकर, बजगुडे, काकडे

बीड :  तालुक्यातील जवळा ते चौसाळा बोगस रस्त्याच्या कामाबाबत चौकशी करून कंत्राटदाराला साथ देणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीचे शेकडो निवेदने जवळा, नाळवंडी, जरूड, कुटेवाडी, बोरफडी, चौसाळा या गावातील सुजाण जिल्हाधिकारी यांना एकाचवेळी दिली आहेत. या बोगस रस्ताकामाचे तक्रारदार धनंजय गुंदेकर व गणेश एस बजगुडे यांनी ही निवेदने कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली. यावेळी उपजिल्हाधिकारी राऊत साहेबांना या रस्त्याच्या कामाच्या सुमार दर्जाबाबत पुरावे देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.

 

 या रस्त्यावर डांबर चांगल्या प्रकारे टाकण्यात आलेले नाही. जीएसबी थर निकृष्ट असून एमपीएम अगदी थातुरमातुर करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण पहिले आहे तेथे नुसता थर देऊन कामाचा दर्जा बोगस करण्याचा सपाटा कंत्राटदाराने लावला आहे. दि 22 मार्च 2021 रोजी या एमडीआर 32 या जवळा ते चौसाळा रस्त्याच्या दर्जबाबत प्रथम तक्रार देण्यात आली होती. 

मात्र या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री शिंदे व श्री कुलकर्णी यांना पुराव्यानिशी सर्व बोगस काम दाखवूनही ते या कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. यामुळे सर्व संतप्त गावकऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना शेकडो निवेदने देत संबंधित कंत्राटदार व त्यांना साथ देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर, गणेश एस बजगुडे, विलास काकडे, गणेश काळे, नितीन राऊत, चौसाळा येथील अजमेर मनियार, सुफीयान मनियार आदींची उपस्थिती होती.




No comments