Breaking News

चतुर्भुज भाऊसाहेब लाच घेताना रंगेहात पकडला


तीन हजार रुपयांची केली होती मागणी, एसीबी आष्टीत कारवाई

आष्टी : शेती वाटणी पत्राद्वारे नावे करण्यासाठी लाचखोर भाऊसाहेबाने लाच मागितली. तीन हजार रुपये घेताना भाऊसाहेबास मंगळवारी दुपारी रंगेहात पकडण्यात आले. कालच एका अधिकार्‍याला लाच घेताना पकडण्यात आले नाही तोच आज लाचखोरीची दुसरी घटना घडली.

बाळु महादेव बनगे (रा. मुर्शदपूर ता. जि. बीड) हे आष्टी तालुक्यातील मोराळे सज्जाला तलाठी म्हणून कार्यरत आहेत. बनगे यांनी शेती वाटणी पत्राद्वारे नावे करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. आज दुपारी तीन हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी व त्यांच्या टिमने केली.
No comments