Breaking News

युसुफवडगावातील किराणा दुकानात ४१ हजार रुपयांचा गुटखा पकडला

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत एका किराणा दुकानात बंदी असलेला ४१ हजार १० रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील शिवरुद्र रामभाऊ चोपणे यांनी त्यांच्या शिवशंकर किराणा दुकानात बंदी असलेला गुटखा साठवणूक करून तो विक्री करीत असल्याची माहिती अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.

 त्या नुसार दि. ८ मार्च रोजी अन्न व भेसळ विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मारेवार व ए.बी. भिसे यांनी  औरंगाबाद विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक सय्यद इम्रान हाश्मी यांच्या देखरेखीखाली धाड टाकली. यात त्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांचा समावेश असलेला गुटखा आढळून आला. तो पथकाने जप्त केला. त्याची किंमत ४१ हजार १०० रु. आहे. या बाबत युसूफवडगाव पोलीस स्टेशनला आरोपी शिवरुद्र चोपणे यांच्या विरुद्ध भा. दं. वि. ३२८, १८८, २७३ आणि अन्न सुरक्षा मानक कायद्याचे कलम ५९ नुसार बंदी असलेले नशिल्या पदार्थांची विक्री व साठवणूक करून त्याची विक्री करणे तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा आणि अन्न सुरक्षा मानक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments