Breaking News

रेशन दुकानांवर गहू-तांदूळ सह सर्व डाळी,खाद्यतेल,ज्वारी,बाजरी,साखर उपलब्ध करून द्या - शेख मतीन


बीड :  रेशन दुकानांवर गहू-तांदूळ सह सर्व डाळी, खाद्यतेल, ज्वारी, बाजरी, साखर इत्यादी उपलब्ध करून देण्याची मागणी एआयएमआयएम चे युवा नेते शेख मतीन यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्नपुरवठा मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
     याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, सन 2020 च्या मार्च महिन्यापासून शासनाकडून देशभर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे जनता अजूनही आर्थिक दृष्ट्या सावरू शकलेली नाही. लॉक डाऊन व नंतर आजपर्यंत ही जनता आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. लोकांच्या हातांना काम नाही आवश्यक असलेला खर्च उचलण्यासाठी खिशात पैसा नाही. अशा अवस्थेमुळे जनता सर्व दृष्टीने हैराण झालेली आहे. अशा अवस्थेत शासनाकडून रेशन दुकानांवर जनतेसाठी वाटप करण्यात येत असलेले अन्नधान्यामध्ये फक्त गहू व तांदूळ हे दोनच धान्य वितरित करण्यात येतात आणि तेही रेशन कार्डधारकांना जेवढे मंजूर असते तेवढे दुकानदार देत नाहीत. शासनाकडून आलेल्या गहू-तांदूळ मध्ये कपात करून रेशन दुकानदार रेशन कार्डधारकांना देतात. अशा रेशन दुकानदारांची चौकशी करून दोषी रेशन दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. 
तसेच कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या आर्थिक मागासलेपणाकडे लक्ष देऊन आणि खाद्यतेल व डाळींचे गगनावर गेलेल्या किंमतीकडे पाहून रेशन दुकानांवर शासनाने गहू-तांदूळ सह सर्व डाळी, खाद्यतेल, ज्वारी, बाजरी, साखर इत्यादी उपलब्ध करून द्यावी. तसेच या सर्व वस्तूंचा योग्य पुरवठा रेशन दुकानदारांकडून रेशन कार्डधारकांना होतोय की नाही हे पाहण्यासाठी प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कार्यान्वित करावी व गोरगरीब रेशनकार्डधारकांना न्याय द्यावा. अशी मागणी  निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व अन्नपुरवठा मंत्री या नात्याने आपणादोघांकडे करीत असल्याचे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रेशन दुकानांवर या सर्व वस्तू लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे युवानेते शेख मतीन यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्नपुरवठा मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
No comments