Breaking News

ना. धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री नसुन 'अन्याय' मंत्री - जिल्हाध्यक्ष राजेश घोडे

माजलगाव : गेली आठ ते दहा दिवसांपासून मानवी हक्क अभियानच्या वतीने माजलगाव येथील मुलींच्या वस्तीगृहाच्या संदर्भाने तहसिलदारांपासुन ते जिल्हाधिका-यांपर्यंत पाठपुरावा सुरू आहे. तरी देखिल याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने बीड जिल्ह्याचे सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे निवडणुकांत मशगुल असुन ते अन्यायमंत्री असल्याचा आरोप मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वस्तीगृहा संदर्भात समाजकल्याण अधिका-यांसोबत चर्चा केली असता धक्कादायक बाब पुढे आली समाजकल्याण अधिका-यांची वस्तीगृह कोविडसाठी देण्याची इच्छा नसतांनाही त्यांचेकडून जबरदस्तीने वस्तीगृह घेण्यात आले तसेच माजलगावच नाही तर जिल्ह्यातील सर्वच मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेले वस्तीगृह कोरोनाच्या नावाखाली कोविड सेंटरसाठी ताब्यात घेउन वस्तीगृहातील मुलं - मुलींना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न आहे का ? याचे उत्तरही सामाजिक न्यायमंत्र्यांनी द्यावं दुसरी बाब 2019 व 20 या वर्षासाठी माजलगाव मतदारसंघामध्ये भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बुध्द विहार व साठेसभागृह या कामांसाठी अकरा कोटी 58 लाख रूपयांचा निधीला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडून मंजुरी देण्यात आली होती. 

 मात्र सामाजिक न्यायमंत्री यांच्या उदासिनतेमुळे आणि दुर्लक्षामुळे हा निधी या कामासाठी वापरण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी दलिातांसाठी आलेला निधी हा इतरत्र वळविला जात आहे. त्याचबरोबर या वस्तीगृहातील मुलींच्या व मुलांच्या पुढील शिक्षणाचे व भविष्याचे काय असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री नसुन अन्यायमंत्री असल्याचा आरोप मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी केला आहे.
1 comment: