Breaking News

केज गुन्हे शाखेची मटका बुक्कीवर कार्यवाही

गौतम बचुटे । केज

केज पोलिसांच्या गुन्हे तपास शाखेने एकुरका येथील मटका बुकीवर धाड टाकून एकास ताब्यात घेतले.

केज तालुक्यातील एकुरका येथे गावातील हनुमान मंदिरा जवळ एक व्यक्ती त्याच्या मालकीच्या हॉटेलमध्ये जादा पैशाचे पैशाचे आमिष दाखवून बेकायदेशीररित्या कल्याण नावाचा मटका खेळत व खेळवित असल्याची गुप्त माहिती केज पोलिसांच्या गुन्हा तपास शाखेला मिळाली. माहिती मिळताच दि. २२ मार्च सोमवार रोजी दुपारी १:३० वा. च्या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने पोलीस जमादार मुकुंद ढाकणे, पोलीस नाईक बाळासाहेब हंकारे व पोलीस कर्मचारी दिलीप गीते यांनी अचानक छापा टाकून बबन श्रीकृष्ण केदार यास ताब्यात घेतले. त्याच्या कडून रोख रक्कम व मटका बुकीचे साहित्य जप्त केले. 

या प्रकरणी पोलीस कर्मचारी महादेव बहिरवाळ यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात बबन श्रीकृष्ण केदार  याच्या विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.
No comments