Breaking News

बजरंग सोनवणे आणि सारिका सोनवणे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस


गौतम बचुटे । केज 

जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिकाताई सोनवणे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आरोग्य व शिक्षण सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन बजरंग सोनवणे व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा युसुफवडगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिकताई बजरंग सोनवणे यांनी दि. ६ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय केज येथे कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती बजरंग सोनवणे म्हणाले. 

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्या नंतर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नसून सर्वांसाठी लस उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्या  सारीकाताई सोनवणे म्हणाल्या.

       

No comments