Breaking News

शेतीपंपाच्या वीजबीलातून मिळतात जिल्हा व गावाला पायाभूत सूवीधा:-शेख अजिमोद्दीन


आष्टी :  तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाला सागण्यात येतं आहे.महावितरण कंपनीने शेतीपंप वीजबिल सक्तीने वसुली सूरू केली त्यात सवलत म्हणून 3000रूपये प्रमाणे रोहीत्रावरील 80टक्के  शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली चालू आहे. बील न भरल्यास रोहीत्र बंद करून शेतकर्‍यांना वेठीसधरून 3000रूपये वसूल केले जातात .3000रूपये भरणाकेल्यावर वीज पुरवठा सुरळीत केला जातो. शेतकऱ्यांनी स्वतः सर्वांचे पैसे गोळा करून वायरमणकडे जमा करावे लागतात. पैसे भरणाकेल्याची पावती शेतकऱ्यांना दिली जाते.
  शेतकऱ्यांना दिल्याजाणार्या पावती प्रमाणे भरलेल्या 3000रूपया पैकी 66टक्के रक्कम म्हणजेच 1485रू66पैसे यापैकी 33टक्के म्हणजे742रू83पैसे ही रक्कम विजबीलातून आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार व आणखी 33क्के रक्कम 742रु83 पैसे ही रक्कम आपल्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधांसाठी  वापरली जाणार असल्याचे कंपनीने शेतकऱ्यांना 3000रू भरणापावतीवर स्पष्ट केले आहे  उरलेले 34टक्के रक्कम म्हणजेच 1534रु 34पैसे  ही रक्कम  महावितरण कशासाठी वापरणार  हे सांगीतले नाही. म्हणजेच शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या विजबीलातून गावचा  ,जिल्ह्याचा व महावितरणचा विकास होणार.   वायरमण साधी फ्यूज टाकून देत नाही, रोहीत्र खराब झाल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेवून दुरूस्ती केली जाते .पोल तारा, रोहीत्र आँईल डिस्क हे वायरमणचे व आँपरेटरचे खाजगी सहाय्यक यांचेकडे वीक्रीसाठी उपल्ब्ध आहे. शेतकऱ्यांना सर्व लुटत आहेत महावितरणने हा नवीन फंडा शेतकरी लुटण्यासाठी काढला आहे. यावर राजकीय नेते भाष्य करत नाही  राज्यसरकार विजवीतरण कंपनीच्या पाठीशी आहे. विरोधक नावाला आहेत. 

 एकही विजवितरण कंपनीचा कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाही .सबस्टेशन आँपरेटर व वायरमण यांनी गावातीलच खाजगी सहाय्य ठेवले आहेत व ते स्वतः तालुक्याला राहतात.क खाजगी सहायक गावातीलच असल्याने कूणी तक्रार करण्यास धजावत नाही. तरी शेतकऱ्यांनी वीजबिल भरूच नये शेतपंपाचे वीज बिल शेतकरी देणे लागत नाही. असे आव्हान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी केले आहे.
1 comment: