Breaking News

शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा सोमवारी लोकशाही मार्गाने नप मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये उपोषण

 


नगरसेवक अमर शेख, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन चिटकून इशारा

बीड :  गेल्या 8 दिवस झाले पूर्ण बीड शहर हे अंधारात असून सुद्धा बीड नगरपरिषद काही लक्ष का देत नाही. बीड शहरात आठ दिवसात चोऱ्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. याचे नगरपरिषदेला काही एक देणेघेणे राहिलेले नाही. एमआयएम नगरसेवक अमर शेख व आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थित दि 17 मार्च रोजी खुर्चीला निवेदन चिटकून शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केलेली आहे. 

   नगरपरिषद कार्यालयात विद्युत विभागाचे कुणीही अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसतात, संपूर्ण शहर अंधारात आहे. नगरपरिषद प्रशासन झोपेत आहे का? दोन दिवसात बीड नगरपरिषदने महावितरणचे बिल अदा करून तात्काळ बीड शहरातील लाईट चालू करावे नसता मुख्याधिकारी यांच्याच कार्यालयात सोमवारी आम्ही लोकशाही मार्गाने मुक्कामी उपोषणास बसू असा इशारा यावेळी आम आदमी पार्टी व नगरसेवक अमर शेख यांनी संयुक्तपणे दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर, आम आदमी पार्टी सचिव रामधन जमाले, शहराध्यक्ष सय्यद सादेक आदींची उपस्थिती होती.

No comments