Breaking News

तलाठी शेलार यांनी शेतकऱ्यांना दिली ई पीक पाहणी ॲपची माहिती


 किल्ले धारूर :  धारूर तालुक्यातील आंबेवडगाव सज्जाचे तलाठी दत्तु शेलार यांनी आज दि ५ मार्च रोजी गावंदरा येथे शेतकर्यांना ई पीकपाहणी या अॅपमध्ये आपल्या पिकांची नोंद कशी करायची याविषयी शेताच्या बांधांवर जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकर्यांना ई पीकपाहणी या अॅपमध्ये आपण आपल्या पिकाची नोंद कशी करायची याविषयी   माहिती देऊन

 त्या अॅपमध्ये पिकांची नोंद करून घेतली यावेळी त्यांनी सांगितले की या ई पीकपाणी अ ॅपवर आपण आपल्या पिकाची   नोंद करू शकता यानुसारच आपल्या शेतात कोणते पीक आहे याची माहिती शासनाला वेळोवेळी होणार आहे जर आपण नोंद केली नाही तर  आपणास शासनाच्या विविध योजनांचा लाभ होणार नाही यासाठी गावातील सर्व शेतकर्यांनी आपण आपल्या मोबाईलवरून या  या अॅपमध्ये आपण आपल्या शेतातील विविध पिकांची नोंद करून घ्यावी असे तलाठी शेलार यांनी सांगितले यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments