Breaking News

परिवर्तन मल्टीस्टेटचा चेअरमन तथा राकाँचा नगरसेवक भारत अलझेंडे पोलिसांच्या ताब्यात


बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

माजलगाव येथील मुख्य कार्यालय असलेल्या परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा मुख्य प्रर्वतक, चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस चा नगरसेवक भारत उर्फ विजय अलझेंडे हा सदरील आर्थिक संस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करून मागील तीन वर्षांपासून फरार होता.अखेर ९मार्च मंगळवार रोजीच्या दुपारी ४वा. माजलगाव च्या अतिरिक्त सत्र न्यायालयात स्वतःहुन हजर झाला.

    याबाबत माहिती मिळाली आहे की, येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थाचे मुख्य प्रर्वतक, चेअरमन भारत उर्फ विजय मरिबा अलझेंडे हा संबंधित संचालकांची दिशाभूल करत त्यांचा विश्वात घात करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करून  मागील तीन वर्षांपासून फरार होता. त्यांने मल्टीस्टेटच्या १३ शाखा चालु केल्या होत्या तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या. याचा अपहार करून मागील तीन वर्षांपासून भारत अलझेंडे फरार होता. ९मार्च मंगळवार रोजीच्या ४वा.माजलगाव येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात स्वतः होऊन हजर झाला. यानंतर अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद एस. वाघमारे यांनी २३मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

     परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये जवळपास कोट्यावधी रूपयांचा अपहार झाल्यानंतर अनेक पेन्शन धारक रस्त्यावर आले. तर संचालक मंडळातील व्यक्तींवर ते केवळ संचालक आहेत या कायदेशीर तांत्रिक बाबी वरून गुन्हे दाखल झाले होते आणि त्यांना आर्थिक गुन्हे शाखे कडून अटकही करण्यात आली आहे. यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.  पण मुख्य सूत्रधार भारत अलझेंडे फरारच होता. दरम्यान भारत मरिबा अलझेंडे हा न्यायालयाला शरण आल्याने या ठिकाणच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.                          भारत अलझेंडे माजलगाव शहर पोलिस ठाण्यात ताब्यात  

कोणत्याही आरोपीला पोलिसां कडून अटक केली नाही आणि त्याने थेट न्यायालयात शरण येण्याचा नैसर्गिक अधिकार आहे आणि त्या बाबतीत न्यायालयाने  आदेश दिले होते पण त्यानंतर संबंधीत तपास अधिकारी यांनी न्यायालयात विनंती केली की, भारत अलझेंडे याला चौकशी करीता पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे. हि विनंती मान्य करून न्यायालयाने भारत अलझेंडे याला पोलिसांच्या ताब्यात दिले असुन तो माजलगाव शहरातील पोलीस ठाण्यात आहे.     

No comments