Breaking News

बीड शहरातील लाईट सुरू करा या मागणीसाठी आम आदमी पक्षाचा मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीनबाहेर ठिय्या


नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रमुख अधिकारी आंदोलनाच्या अनुषंगाने गायब

बीड :  गेले 8 दिवस झाले पूर्ण बीड शहर हे अंधारात असून सुद्धा बीड नगरपरिषद काही लक्ष का देत नाही. बीड शहरात आठ दिवसात चोऱ्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. याचे नगरपरिषदेला काही एक देणेघेणे राहिलेले नाही. आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे व सहकाऱ्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थित दि 17 मार्च रोजी खुर्चीला निवेदन चिटकून शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केलेली होती. मात्र लाईट न सुरू झाल्याने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीनबाहेर आम आदमी पक्षाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

   नगरपरिषद कार्यालयात विद्युत विभागाचे कुणीही अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसतात, संपूर्ण शहर अंधारात आहे. नगरपरिषद प्रशासन झोपेत आहे का? दोन दिवसात बीड नगरपरिषदने महावितरणचे बिल अदा करून तात्काळ बीड शहरातील लाईट चालू करावे या मागणीसाठी मुख्याधिकारी यांच्या कॅबिनबाहेर आम आदमी पक्षाचे ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे व शहराध्यक्ष सय्यद सादेक हे या ठिय्यास बसले आहेत.


मोठ्या संख्येने पोलीस तैनात

ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या आवारात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत मात्र नगरपरिषदेचे अधिकारी अनुपस्थित असून आहेत त्या अधिकाऱ्यांना काहीही सांगता येत नसल्याची परिस्थिती आहे.
No comments