Breaking News

लॉकडाऊनमध्ये भाडे, व्याज वसुली बंद करा सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील यांची प्रशासनाकडे मागणी


बीड : कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर तब्बल वर्ष ओलांडून गेले आहे. तरीही कोरोनाचा अटकाव होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शासन कोरानाची रुग्ण वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून लॉकडाऊन करत आहे मात्र या लॉकडाऊनमुळे वर्षभरात सर्वसामान्य माणुस कोलमडून गेला आहे. हातावर पोट असणार्‍यांचीच तर खूप दयनीय अवस्था झाली आहे. सध्या तर पहिल्याच आर्थिक विंवचनेत असलेल्या गोरगरीबांना आता घातलेल्या या लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. पोटाची खळगी भरायची का? घर भाडे द्यायचे का? व्याजाची रक्कम द्यायची अशी चक्रव्युहात पडल्यासारखी अवस्था त्यांची झालेली असून शासनाने कुठेतरी या गंभीर बाबीचा विचार करायला पाहिजे. 

शेतकर्‍यांचीही या लॉकडाऊनमुळे अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे.  कशीबशी निसर्गाच्या संकटातून वाचवून पिके बहरलेली होती ती त्यात अवकाळी वादळी वार्‍यासह पडलेला गारांचा पाऊस यामुळे पिकांची मोठी नासाडी झालेली आहे.

 वर्षभरात एक नव्हे तर अनेक संकटे येवून गेली आणि त्यात कोरानाच्या नावाखाली लॉकडाऊन करून आणखी छळण्याचे काम प्रशासन करत आहे. गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजारांची मदत देवून प्रशासनाची थोडी तरी माणुसकी दाखवावी. याचबरोबर लॉकडाऊन काळात कोणाकडूनही भाडे वसुली न करता त्यांना सुट द्यावी. ज्या गोरगरीब जनतेने सावकारांकडून व्याजापोटी घेतलेले पैसे परत फेडण्यासाठी त्यांना लॉकडाऊन काळात सवलत द्यावी. जर हाताला कामच नसेल तर हे आर्थिक चक्र कसं सर्वसामान्य पुर्ण करू शकेल याचाच न्याय भुमिका समोर ठेवून प्रशासनाने करायला हवा आणि लॉकडाऊन काळात कोणतेही भाडे व व्याज वसुली होवू नये असे आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक(दादा) ढोले पाटील यांनी केली आहे. 
No comments