सिंदफाणा धरणाची उंची वाढवण्याचे कामाला गती
शिरूर कासार : शिरूर तालुक्यातील सिंदफणा धरणाची उंची वाढवून कॅनॉल पुर्ण करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी काम पुर्ण करण्याचे आदेश दिले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
सदरील हा प्रकल्प पुर्ण झाल्यास तालुक्यातील 22 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. धरणाच्या कामाला गती मिळण्याच्या दृष्टीने औरंगाबाद येथे मुख्य अभियंता आव्हाड यांची भेट घेऊन महेबूब शेख यांनी या संदर्भात चर्चा केली. सिंदफणा धरणाची उंची वाढवणे तसेच कॅनॉलचे व ब्रह्मनाथ येळंब बॅरेजमध्ये त्याचे रुपांतर करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली.
No comments