Breaking News

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशासाठी पालकांनी अर्ज करावेत - मनोज जाधव


२ हजार १९२ जागांसाठी पालक करू शकणार ऑनलाईन अर्ज

३ मार्चपासून २१ मार्च पर्यंत मुदत

बीड :  बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी आरटीई अंतर्गत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला बुधवार ३ मार्चपासून सुरुवात होणार असून, पालकांनी प्रवेश प्रक्रिया समजून घेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन शिवसंग्रमचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.

           बीड जिल्ह्यातील सर्व शाळांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण जिल्ह्यात २३३ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २ हजार १९२ विद्यार्थ्याना मोफत प्रवेश मिळणार आहेत. त्यानुसार ३ मार्च पासून ते २१ मार्चपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करता येतील. मात्र अर्ज दाखल करण्याच्या मुद्दतीत वाढ ही होऊ शकते तसेच यंदा ही प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू झाल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागू शकतो या मुळे पालकांना येणाऱ्या काळात नाहक त्रास सहन करावा लागेल असे मत मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.

गरिबांच्या प्रवेशावर श्रीमंतांनी डल्ला मारू नये - मनोज जाधव

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाची संधी ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गोर - गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे. या मोफत प्रवेशावर शासकीय नैवकरदार, आयकर भरणारे व्यापारी, निमशासकीय नैवकरदार ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखा पेक्षा अधिक आहे. अश्या श्रीमंत पालकांनी   खोटी कागदपत्रे दाखल करत या योजने अंतर्गत शासनाची धूळ फेक करत प्रवेश घेऊ नये. असे केल्यास या कायद्याचे उल्लघन होईल आणि असे पालक आढळल्यास या पालकांन विरोधात कायदेशीर कारवाई होवू शकते असे आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी म्हंटले आहे.

आरटीईच्या शाळा वाढल्या, पण जागा घटल्या

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी जिल्ह्यात आरटीईच्या प्रवेशासाठी शाळांची नोंदणी झाली असून. सध्या बीड जिल्ह्यात २३३ शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षी एकुण २२६ शाळांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी २२६ शाळेत २ हजार ९२६ जागा आरटीईसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु यंदा २३३ शाळेतून केवळ २ हजार १९२ जागा आरक्षित केल्या आहेत.

प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक

निवासाचा पुरावा - ( आधार कार्ड, मतदान कार्ड, फोन बिल, लाईट बिल, जागेचा पीटीआर, ड्रायव्हिंग लायसन्स, भाडे तत्त्वावर राहणाऱ्या पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा) जन्माचे प्रमाणपत्र , वंचित घटकतील पालकांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला , वंचित घटक वगळता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी पालकांचा  १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला, घटस्फोटित महिलेसाठी न्यायालयाचा निर्णय आणि आई व बालकाचा रहिवासी पुरावा तसेच वडिलांचे जात प्रमाणपत्र, आईचा उत्पन्न दाखला ग्रह्य धरला जाईल, विधवा महिलेसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र व पतीचा  रहिवासी पुरावा ग्रह्य धरला जाईल, अनाथ बालकासाठी अनाथालयाची कागदपत्रे, जे पालक सांभाळ करतात त्याचे हमीपत्र, दिव्यांग बालकांसाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असावे.


जिल्ह्यातील तालुका निहाय प्रवेश क्षमता


तालुका             शाळेची संख्या     प्रवेश क्षमता

१ अंबाजोगाई         37                315 ​​

२ आष्टी                14                  51 

३ बीड                   18                172 

४ धारूर                   8                114

५ गेवराई               36                362   

६ केज                   21                198

७ माजलगाव          29                234 

८ परळी                 29                315 

९ पाटोदा                 4                  20

१० शिरुर               10                  69 

११ वडवाणी             7                  86

१२ बीड शहर          20                256


एकूण                    233             2192 

No comments