Breaking News

साळेगाव येथील उपकेंद्रात कोरोना तपासणी

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील चिंचोली माळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील साळेगाव उपकेंद्रात गावातील छोटे व्यावसायिक, दुकानदार, टपरी चालक, किराणा दुकानदार, सलून चहा व फराळाचे हॉटेल्स, बीअरबार आणि खानावळी चालक यांच्या अँटिजेन व आरटी-पीसीआर या कोरोनाच्या चाचण्या व तपासण्या करण्यात आल्या. 


या वेळी चिंचोली माळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आसाराम चौरे, डॉ. दिपाली बुदगुडे, लांडगे मॅडम, प्रयोग शाळा तंत्रज्ञ शारेख, आशा स्वयंसेविका दैवशाला सरवदे, संजीवनी विघ्ने, अनुराधा इंगळे या उपस्थित होत्या. दरम्यान या उपकेंद्रात एकूण ८४ तपासण्या झाल्या त्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे.
No comments