Breaking News

शहरातील पथदिवे तात्काळ सुरु करण्याची मागणी


विद्युत सभापती किशोर पिंगळे यांचे महावितरणला निवेदन


बीड : येथील महावितरण कार्यालयाने बीड शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. महावितरण कार्यालयाने तात्काळ सुरु करावेत अशी मागणी बीड नगर परिषदचे विद्युत सभापती किशोर पिंगळे यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
  मागील वर्षभरापासून ते आजतायगत कोरोना संकट कायम आहे. मालमत्ता व पाणी कर वसूली करताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही बीड नगर परिषदने महावितरणचा 3.5 कोटी रुपयांचा थकीत भरणा केलेला आहे. 
पथदिवे ही अतिशय महत्वाची बाब आहे. त्यामुळे बीड नगर परिषदने ऊर्जा संवर्धन 2017 अंतर्गत संपूर्ण बीड शहरात एलईडी पथदिवे बसविले आहेत. परंतु वीज खांबांना मीटर नसल्याने महावितरणकडून अंदाजे वीज बिल दिले जात आहे. त्यामुळे तात्काळ वीज मीटर बसवून पथदिवे तात्काळ सुरु करावेत किंवा काही ठिकाणी मीटर बसवून त्यानुसार इतर ठिकाणीचे देयके आकारणी करावी अशी मागणी विद्युत सभापती किशोर पिंगळे यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. या वेळी इतर नगर सेवकही उपस्थित होते. पुढील दोन दिवसांत पथदिवे सुरु करु असे आश्वासन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी या वेळी दिले.
No comments