Breaking News

नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ . लालासाहेब घुमरे यांची नियुक्ती

परळी वै :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवगण कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. लालासाहेब घुमरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . बाळासाहेब देशमुख होते . याप्रसंगी मा बाळासाहेब देशमुख माजी प्राचार्य डॉ.आर. एस बांगड, श्री जाधव, प्रा. डॉ. दयानंद कुरुडे, प्रा. डी. टी. शिंदे यांनी प्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे यांचा सत्कार केला. 

सत्काराला उत्तर देताना डॉ. घुमरे म्हणाले की, "महाविद्यालयाच्या जडणघडणीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू "असे सांगितले . माजी प्राचार्य डॉ. बांगड यांनी डॉ. घुमरे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . शेवटी अध्यक्षीय समारोपात मा बाळासाहेब देशमुख यांनी" महाविद्यालयाचे नाव अधिकाधिक उज्ज्वल करावे" असे सांगून  डॉ घुमरे यांना शुभेच्छा दिल्या . संस्थेचे अध्यक्ष मा जयदत्तजी अण्णा क्षीरसागर ,संस्थेचे सचिव मा.डॉ. भारतभुषणजी क्षीरसागर ,प्रशासक प्रा डॉ. राजू मचाले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी डॉ. घुमरे यांचे अभिनंदन केले . कार्यक्रमाचे संचलन प्रा.सोनवणे तर आभार प्रा आलदे यांनी मानले. 

No comments