Breaking News

गायरान जमिनिसाठी भटक्या समाजातील महिलांचे लहान मुलांसह जिल्हा कचेरीसमोर उपोषण

बीड :  सरकार आमच्यासाठी काहीही देत नाही, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही गायरान जमिनीसाठी लढा देत आहोत याची साधी दखल कोणी घेत नाही असा संताप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या महिलांनी व्यक्त केला. गायरान जमिन नावे करण्यासाठी या मागणीसाठी भटक्या समाजातील काही नागरिक कलेक्टर कचेरीसमोर आपल्या लहान मुलांसह आंदोलन करत आहे.

केज तालुक्यातील नायगाव येथील दहा एक्कर 38 गुंठ्ठे गायरान जमीन नावे करून त्याचा सातबारा देण्यात यावा या मागणीसाठी पवार कुटुंबिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून लढा दिला जात आहे. मात्र याची दखल शासन आणि प्रशासन घेत नसल्याचा आरोप करत सरकार आमच्यासाठी काहीही करत नाही असा संताप महिलांनी व्यक्त केला आहे. गायरान जमिन नावे केल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिला आहे.

No comments