Breaking News

कडा शहरात विना मास्क फिरणाऱ्यांमुळे कोरोना संसर्गाचा धोका


व्यवसायकांमध्ये भीती, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

शेख कासम । कडा

आष्टी तालुक्यातील कडा शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना विना मास्क फिरणार्‍यांमुळे कोरोनाचा संसर्ग फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे व्यवसायकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका संभावत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरलं असून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कड्यातील व्यापाऱ्यांतून होत आहे. 

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून शासन - प्रशासनाने कोविड - १९ च्या नियंत्रणासाठी नागरिकांना सतत अवाहन केले जात असून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र नियमांची पायमल्ली करून काही नागरिक कड्यात विनामास्क बेफिकीरपणे संचार करत आहे. अशातच कडा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याने मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांमुळे  छोट्या - मोठ्या व्यवसायीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून कडा शहरातील व्यवसायकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करवून घेतले जात असून बरोबर सात वाजता बाजारपेठेतील छोटे- मोठे व्यवसाय पोलिसांकडून तंतोतंत बंद केले जात आहेत. मात्र ज्या प्रकारे पोलिस दलातील आणि ग्रामपंचायत कर्मचारी तळमळीने कामे करतात तसे विना मास्क फिरणार्‍यावर का मेहरबान ? असा प्रश्न छोट्या- मोठ्या व्यवसायाकडून उपस्थित केला जात आहे. मास्कविना बेफिकिरपणे फिरणाऱ्यांवर देखील कारवाई करून कोरोनाचा धोका टाळावा अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.
No comments