Breaking News

साळेगाव येथे कोरोनाचा तिसरा बळी

गौतम बचुटे । केज  

साळेगाव ता केज येथे वाल्मिक नारायण गालफाडे वय (४७ वर्ष) यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले.

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता केज येथील वाल्मिक नारायण गालफाडे वय ४७ वर्ष यांचे दि. ३१ मार्च रोजी सायं ५:३० वा. च्या दरम्यान अंबाजोगाई येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान साळेगाव येथे मागील आठवड्यात या पूर्वी प्रभाकर गालफाडे (२४ मार्च ) आणि श्रीमती कस्तुरबाई गालफाडे (२२मार्च) या दोघा माय लेकांचे निधन झाले होते. मयत वाल्मिक गालफाडे हे अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक होते. त्यांच्या पश्चात वृद्द वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

No comments