Breaking News

जप्ती पारगाव येथील कापसाचे गोडाऊन आगीत भसमसात

७० कोटीच्या कापसाच्या गठाणी जळून खाक ; आगीत संशयाचा धूर?

गेवराई :  जप्ती पारगाव येथील एका खासगी गोडाऊनला मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये शासनाने व काही खासगी व्यापार्‍यांनी कापसाच्या गठाणी ठेवलेल्या होत्या. त्या गठाणी जळाल्या असून यात जवळपास 70 कोटी रूपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रात्रीपासून ते आज दुपारपर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच आहे. मात्र 1 वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. या आगीबाबत संशय व्यक्त केला जातो. गोडाऊनमध्ये लाईट नसतांना आग लागली कशी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

बीडपासून काही अंतरावर असलेल्या जप्ती पारगाव येते गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये शासनाने व काही व्यापार्‍याने मोठ्या प्रमाणात कापसाच्या गठाणी ठेवल्या आहेत.

 मध्यरात्रीच्या दरम्यान या गठाणीला आग लागली. आग लागल्याची माहिती झाल्यानंतर आग विझवण्यासाठी बीड जिल्ह्यासह जालना येथील अग्निशामक दलाला पाचारन करण्यात आले हेाते. रात्री पासून 25 ते 30 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. मात्र आज दुपारी 1 वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. या गोडाऊनमध्ये लाईट नसतांना आग लागली कशी? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला. आगीच्या बाबत संशयाचा धूर निघू लागला. या आगीत जवळपास 70 कोटी रूपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते. ज्या व्यापार्‍यांनी या गोडाऊनमध्ये कापसाच्या गठाणी ठेवलेल्या होत्या त्या व्यापार्‍यांनी बुलढाणा अर्बन बँकेच्या मार्फत विमा काढला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

No comments