Breaking News

आरोग्य विभागाच्या पेपरचे नियोजनच आजारी अवस्थेत . :- प्रशांत डोरले


परीक्षा या एमपीएससी बोर्डाकडून व बायोमेट्रिक पद्धतीनेच व्हाव्यात

बीड  :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी विविध केंद्रांवर रविवारी (28 फेब्रुवारी) रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षांच्या अयोग्य नियोजन व व्यवस्थापन तसेच काही ठिकाणी सिल बंद पेपर नसणे, जागेवर बसण्यास मार्क केलेले नसणे, एकाच जागेवर विविध विद्यार्थी बसविणे, सामूहिक कॉपी करणे असे प्रकार दक्ष विद्यार्थी यांनी उघड केलेले आहेत. परीक्षांमध्ये झालेल्या घोळामुळे बऱ्याच परीक्षा सेंटरवर गोंधळ दिसून आला. त्यामुळे आरोग्य विभागाने नव्याने घेऊन रविवारी झालेले पेपर रद्द करण्यात यावी असे विद्यार्थी यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी च्या वतीने प्रशांत डोरले यांनी केली आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे आयुष्यातील अनमोल असे काही वर्षे या परीक्षांचे अभ्यास व सराव करत असताना, अश्या पद्धतीने बोगस विद्यार्थी व घोटाळे करून परीक्षा होत असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य हे अंधारमय करण्याचे काम सरकार करतंय. औरंगाबाद, नागपूर, नाशिक, व नगरमध्ये परीक्षा सेंटर वर कुठलीही पूर्वतयारी न करता परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी झालेल्या गोंधळा वरून ते स्पष्ट दिसून आले आहे. औरंगाबाद व नागपूर आधीच प्रश्न पत्रिका फुटल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांनी केली होती, तर अहमदनगर मध्ये बोगस विद्यार्थी,    इलेक्ट्रॉनिक गझेट व इंटरनेट चा वापर करताना ही दिसून आले होते, काही ठिकाणी तर कारोनाचे नियम धाब्यावर बसवून एका बेंचवर दोन विद्यार्थी बसवण्याचे प्रकार ही समोर आले आहे.

सदर परिक्षांवर या विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने या परीक्षा खाजगी कंपनीला कंत्राट न देता एमपीएससी च्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात याव्यात अशी मागणी शिवसंग्रामचे प्रशांत डोरले व विद्यार्थी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

No comments