तरुणची गळफास घेऊन आत्महत्या
शेख कासम । कडा
आष्टी तालुक्यातील शिरापूर शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून ३६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यातील शिरापुर येथील केशव गंगाधर भालेकर (वय ३६) याने शिरापुर शिवारात जाऊन एका लिंबाच्या झाडाला बुधवारी दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महात्या केली असून अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी कडा ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला आहे. पुढील तपास ए. पी. आय. कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. नागरगोजे करत असून दरम्यान ही दुर्देवी घटना नवरा- बायकोच्या वादातून घडल्याची चर्चा परिसरात होत आहे.
No comments