Breaking News

विनाअनुदानित शाळा ,महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्या !---सुरेखा जाधव


बीड : विनाअनुदानित शिक्षकांच्या पगाराची हेळसांड संपणार कधी ?महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न काही सुटता सुटेना .निवडून  येणाऱ्या प्रत्येक  सरकारने  विनाअनुदानित शिक्षकांच्या पगारावरच्या  प्रश्नावर फक्त राजकारण करत आल्याचे दिसून येत आहे .या सरकारच्या पेक्षा पहिले सरकार बरे असे म्हणण्याची वेळ प्रत्येक पंचवार्षिक ला दिसून येत आहे .आज विनाअनुदानित शिक्षक आझाद मैदानावर गेली 50 दिवसापासून आंदोलन करत आहेत याची दखल काही शासन घेत नाही.

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून शिक्षक  विनावेतन ज्ञान दानाचे पवित्र कार्य करत आहेत .शिक्षकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक शिक्षकांनि आत्महत्त्या करून आपला जीवन प्रवेश संपवला आहे याची थोडी ही जाग ह्या महाविकास आघाडीला येत नाही. अक्षरशः या विणानुदानावरच काही शिक्षक सेवा निवृत्त झाले आहेत या विनाअनुदानित शिकक्षकांच्या संसाराचा गाडा कसा  चालायचा याचे थोडे ही भान या महाविकास आघाडी च्या सरकारला का नाही ?असा सवाल जनता करत आहे.या विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षनांचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुली लग्नाला आल्या आहेत त्यांच्ये कन्यादान कसे करावे हाही मोठा प्रश्न विनाअनुदानित शिक्षकांना पडला आहे.आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांची व्यथा संगावी तेवढी कमी आहे.शिक्षणाचा या पवित्र कार्याला एक काळिमा फासणारी रितच या सरकारने चालवलेली दिसून येत आहे. 

विनाअनुदानित शिक्षकांच्या पगार शंभरटक्के देऊन लवकरात लवकर  हा प्रश्न मार्गी लावावा नसता मंत्त्रांनी ही विनावेतन काम करून पाहावे .आपल्या संसारात कशी परेशानी काढावी लागते हे त्यांना  समजेल .स्वतः ए.सी.मध्ये बसून फक्त पोकळ निर्णय घेऊन शिक्षकांची पार थट्टा लावली आहे. फक्त अश्वसनाचे गाजर दाखवून इथपर्यंत शिक्षकांना आणले आहे .परंतु या विनाअनुदानित शिक्षकांचा संसाराचे पाप कधीही फेडावे लागणार आहे असा रोष विनाअनुदानित शिक्षकांच्या परिवारातून व्यक्त केला जात आहे. 

कधी 20 तर कधी 40 टक्के देऊन अघोषित बांधवना तर फक्त आम्ही निधीसह घोषित करून घेऊ असे पोकळ आश्वासन ही शिक्षक आमदार म्हणताना दिसत आहेत.  शरद पवार साहेबावर फार अपेक्षा लावून बसलेले होते हे विनाअनुदानित शिक्षक. परंतु  त्यांनी ही पार निराशाच या विषयात  दाखवून दिली.  सर्व विनाअनुदानित बांधवांना लवकरात लवकर शंभरटक्के अनुदान दयावे नसता सर्व महिला भगिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून या विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून दिले जाईल. असा इशारा  महिला सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांनी  दिला आहे. एकीकडे कोरोना महामारीने  थैमान माजवले असताना शिक्षक बंधू भगिनींना विना पगार काम करून घेणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असेच झाल्याचे दिसून येत आहे.
No comments