Breaking News

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ : वंचीत आघाडीचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन


माजलगाव :   केंद्र सरकारने पारीत केलेले शेतकरी विरोधातील तीन काळे कुषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून दिल्ली येथील सिंधु बाँर्डर वर शेतकरी आंदोलन करीत असल्याच्या समर्थनार्थ व शेतकरी विरोधातील तीन्ही काळे कुषी रद्द करण्याच्या मागणीसाठी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वंचित आघाडीच्या वतिने दि ०५ मार्च शुक्रवार रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने पारीत केलेले शेतकरी विरोधातील तीन्ही काळे कुषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून दिल्ली येथील सिंधु सिमेवर वर शेतकरी आंदोलन करीत असुन केंद्र सरकारने अद्याप पर्यंत दखल न घेतल्याने आतापर्यंत या शेतकरी आंदोलनात २०० शेतकऱ्यांचा मुत्यु होऊनही केंद्र सरकारने कायदा केलेले तिन्ही हि काळे कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याच्या निषेधार्थ व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व शेतकरी विरोधातील तीन्ही काळे कुषी रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचीत आघाडीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात दि ०५ मार्च शुक्रवार रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

त्याअनुषंगाने माजलगाव येथे वंचित आघाडीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारने पारीत केलेले तीन्ही काळे कुषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले, या धरणे आंदोलनात वंचित आघाडीचे जिल्हा प्रवक्ते धम्मानंद साळवे,जिल्हा सचिव आंकुशराव जाधव,जिल्हा उपध्याक्ष भारत तांगडे, जिल्हा सदस्य लक्ष्मण जाधव,विठ्ठल पंडीत, प्रशांत बोराडे,डाँ.संजय नाकलगावकर,शत्रुघ्न कस्बे,संजय फंदे,बाळासाहेब गायसमुद्रे,राजेश विघ्ने व रामभाऊ उदमले यांचा सहभाग होता.

No comments