Breaking News

सहाय्यक फौजदार महादेव जाधव यांचे कोरोनाने दुःखद निधन


गौतम बचुटे । केज

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव जाधव वय (५७ वर्ष) यांचे दि. १६ मार्च रोजी कोरोना संसर्गामुळे सकाळी १०:०० वा. दुःखद निधन झाले.

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस स्टेशन येथे पूर्वी पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले महादेव जाधव यांची अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनला बदली झाल्या नंतर त्यांना ऑक्टोबर २०२० मध्ये सेवांतर्गत सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती झाली होती. ते सध्या ते अंबाजोगाई येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. मागील आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच त्यांचे दि. १६ मार्च रोजी सकाळी १०:०० वा उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यू बद्दल केज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि केज, चिंचोली माळी, साळेगाव, काळेगाव, हनुमंत पिंपरी, बोरगाव, लाखा, डोका, हादगाव, अंबाजोगाई परिसरातील गावचे सरपंच, नागरिक, सहकारी अमोल गायकवाड व अशोक गवळी हे हळहळ व्यक्त करीत आहेत. तसेच केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
No comments