Breaking News

“करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे….,” मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा टोला


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांना टोला लगावला असून करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत असं म्हटलं आहे. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून यावेळीही त्यांनी मास्क घातलेला नव्हता. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक पोहोचले होते, यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना मास्क काढा अशा सूचना केल्या. राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित अनेक कार्यकर्ते मास्कविनाच उपस्थित होते.

संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे. “करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे. अजित पवारांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे. आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

No comments