Breaking News

'पवनसूतवर' बजरंग सोनवणे यांनी केला आदर्श पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

गौतम बचुटे । केज  

नुकताच आदर्श पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडी बद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या 'पवनसूत' निवासस्थानी आदर्श पत्रकार संघाचा सत्कार केला.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुका आदर्श पत्रकार संघाची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली आहे. आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून अशोकराव सोनवणे तर सचिव म्हणून गौतम बचुटे व कार्याध्यक्षा म्हणून सौ.रत्नमाला शिवदास मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच त्यांचे सहकारी उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, महादेव काळे, प्रवीण देशमुख, प्रकाश मुंडे, धनंजय घोळवे, जय जोगदंड आदी पदाधिकाऱ्यांच्या देखील निवडी बिनविरोध झाल्या आहेत. 

त्या बद्दल दि. २ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांनी केज येथे 'पवनसूत' या त्यांच्या निवासस्थानी आदर्श पत्रकार संघाचा सत्कार आयोजित केला होता. 

या वेळी दत्तात्रय उर्फ पिंटू ठोंबरे, प्रा. विनोद गुंड, शिंदे, तारळकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष अशोक सोनवणे, सचिव गौतम बचुटे, रत्नमाला शिवदास मुंडे, प्रा. हनुमंत भोसले, धनंजय कुलकर्णी, विजयराज आरकडे, शिवदास मुुंडे, धनंजय देशमुख, बाळासाहेब जाधव, महादेव काळे, धनंजय घोळवे, प्रकाश मुंडे, जय जोगदंड, प्रवीण देशमुख, अक्षय बनसोडे यांचा शाल, पुुष्पगुच्छ देेेऊन पुुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments