शिरुर नगरपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेच्या 42 लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप
शिरुर, का : शहरातील प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतील ४२ पात्र लाभार्त्यांना येथील नगर पंचायतीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह बिनव्याजी भांडवल कर्जाच्या मंजूरी पत्राचे वाटप मुख्याधिकारी किशोर सानप, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक आडगावकर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.९) करण्यात आले.
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून शिरुर कासार शहरातील एकूण ४२ लाभार्त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा लाभ एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह बिनव्याजी खेळते भांडवल कर्जाचा लाभ देण्यात आला असून प्रातिनिधिक स्वरूपात मंगळवारी राजेंद्र काळू घोरपडे (टेलर), शेख अजीज सिंकदर (फळ विक्रेता), बाळू रघुनाथ वारे (भाजीपाला विक्रेता), शब्दर असराफ शेख (फळ विक्रेता), अमोल सुभाष काटे (कॉम्पुटर सेंटर), नागेश तोडकर (झेरॉक्स सेंटर) या लाभार्थ्यांना मंजूरीपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी शफीक पठाण, भाऊसाहेब मोरे, कौसर शेख यांची उपस्थिती होती. शिरुर कासार शहरातील पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून दहा हजार रूपये बिनव्याजी खेळते भांडवली कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरुर कासार नगर पंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.
No comments