Breaking News

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांची वाढ, निवृत्तीचे वयही तीन वर्षांनी वाढवले

हैदराबाद : तेलंगणा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. तेलंगणा सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 30 टक्क्यांची घसघसीत वाढ केली आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीतही तीन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचा लाभ राज्यातील 9.17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली आहे.

तेलंगणात या आधी सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे इतकं होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून ते 61 इतकं करण्यात आलं आहे. येत्या 1 एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.

सरकारच्या या निर्णयाचा 9.17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिली. यामध्ये कॉन्ट्रक्टवरचे कर्मचारी आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  या सगळ्यांच्या वेतनात एक एप्रिलपासून वाढ होणार आहे.

गेल्या सात वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली नव्हती. आता सात वर्षानंतर पगारात वाढ झाल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या आधी 2014 साली कर्मचाऱ्यांच्या वेतनात 43 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

सध्याचा वेतन वाढीचा निर्णय आहे, तसेच निवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठी राज्य सरकारने निवृत्त आयएएस अधिकारी सीआर बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने वरील शिफारसी केल्या आणि राज्य सरकारने त्या अंमलात आणल्या आहेत.
No comments