Breaking News

मुर्शदपुर ग्रामपंचायतच्या वतीने 25 लक्ष रुपये निधीच्या विकास कामाचे युवा नेते सागर धस यांच्या हस्ते उद्घाटन

आष्टी :  तालुक्यातील मुर्शदपुर, कासारी,शिदेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने बुधवार दि.3 मार्च रोजी मुर्शदपुर तसेच धनवडे वस्ती भागामध्ये 25 लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे उद्घाटन युवा नेते सागर धस यांच्या हस्ते करण्यात आले.

गतवर्षी या ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर हि ग्रामपंचायत एकहाती आ.सुरेश धस यांच्या ताब्यात आली.त्यानंतर मुर्शदपुर ,कासारी,शिदेवाडी ग्रामपंचायत ने विविध विकासकामांच्या माध्यमातून या भागात विविध उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.याचाच एक भाग म्हणून  15 व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीच्या माध्यमातून मुर्शदपुर तसेच धनवडे वस्ती या भागामध्ये सुमारे 25 लक्ष रुपये निधीच्या कामांचे उद्घाटन युवा नेते सागर धस यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले.

या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक बसविणे,शाळा दुरुस्ती करणे,धनवडे वस्ती, रामदास स्वामी मंदिर या परिसरात पेविंग ब्लॉक बसविणे,तसेच मुर्शदपुर भागात  पथदिवे बसविणे,भूमिगत नाली बांधकाम करणे,पाईप लाईन करणे,नगर रोड ते पिंपरी रस्ता मुरूम रोड बांधकाम करणे यासह अन्य  कामे या निधीच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहेत.लवकरच आगामी काळात आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्शदपुर कासारी आणि शिदेवाडी गावचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट करण्याचा माणस असल्याने यासाठी लागणारा निधी आणि त्याचा पाठपुरावा आमचे नेते आ.सुरेश धस हे निश्चितपणे करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मुर्दशपुरची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे मत नवनिर्वाचित सरपंच अतुल कोठुळे यांनी व्यक्त केले. 

यावेळी उपसरपंच सागर धोंडे ,ग्रामसेवक बाळासाहेब थोरवे, मा. जि. प. सदस्य खंडु जाधव ,पं. स. सदस्य अशोक मुळे, ग्रा. प. सदस्य मधुकर लोखंडे, सचिन काकडे, भैरु चव्हाण ,संतोष रनसिंग, राजु गिते, संतोष धनवडे, दादा धस, मनोज धनवडे, संजय सुरवसे, नवनाथ कोकरे, गणेश धनवडे, विक्की धनवडे, अंकुश गरसुळे, बाबु धनवडे, बाळासाहेब चव्हाण, महादेव धनवडे आदी उपस्थीत होते.

No comments