Breaking News

बीडमध्ये 12 व्या आठवड्यातही आम आदमी पार्टीचे स्वच्छता अभियान सुरूच

बीड :  आम आदमी पार्टीचे सलग 12 व्या आठवड्यात सफाई अभियानाचे पदार्पण झाले. आज चांदणी चौक खडकपुरा जागीरदार मळा यामध्ये सफाई अभियान राबविण्यात आले. यावेळी अभियानांमध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिक सामील झाले व ढोर गल्ली खडकपुरा धोबी वाडा या चौकाचे सुशोभीकरणाच्या नावाखाली होत असलेली जनतेच्या पैशाची लूट जनतेसमोर आणण्याचा काम आम आदमी पार्टी करत आहे.


    यावेळी या अभियानामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे जिल्हा सचिव रामधन जी जमाले संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत कैलाश पालीवाल रामभाऊ शेरकर शहर प्रमुख सय्यद सादेक स्वप्निल गायकवाड अभिषेक टाळके योगेश पवार  इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments