Breaking News

आष्टीच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यावे : न्या.  के. के. माने

 आष्टी : आष्टी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, क.स्तर, आष्टी येथे  तालुका विधी सेवा समिती आष्टी व वकील संघ आष्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 10 एप्रिल 2021रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन मा.के.के. माने, अध्यक्ष, तालुका विधी समिती, आष्टी, तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर, आष्टी, यांनी केले आहे.

        पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी येणाऱ्या लोक अदालतीत ठेवावीत. सदरच्या लोक अदालतमध्ये दाखल पूर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे , दिवाणी दावे, फौजदारी खटले, बँकांची कर्ज प्रकरणे, दूरध्वनी देयकाची असे विविध प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सहभागी होऊन प्रकरणे तडजोडीने मिटवावेत असे आवाहन मा.के.के. माने, अध्यक्ष, तालुका विधी समिती, आष्टी, तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर, आष्टी, यांनी केले आहे. आयोजित करण्यात येणारे राष्ट्रीय लोक अदालत हे कोविड -19 बाबत मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या सर्व निर्देशाचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे.

No comments