Breaking News

शहराच्या खोळंबलेल्या विकासासाठी युवकांचा शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश

आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते अर्जुन यादव सह युवकांचा शिवसंग्राम मध्ये प्रवेश

बीड  : शिवसंग्राम पक्षसंघटना विस्ताराचे धोरण सध्या शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकरावजी मेटे साहेब यांनी सुरु केले असून, जिल्हाभरात लोकप्रियता वाढते आहे. युवकांचा विकास, महिलांचे सक्षमीकरण, स्वछता, पायाभूत सुविधांमध्ये विकासात्मक काम करण्याचे प्रभावी धोरण आ.विनायकरावजी मेटे साहेब करत असल्याचे बीड जिल्ह्यातील युवकांनी ओळखले आहे. जिल्ह्यातील विविध स्तरातील, जातीधर्मातील युवकांना आ.विनायकराव मेटे यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे.बीड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवकांनी युवक नेते रामहरी भैय्या मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम युवक आघाडीमध्ये प्रशांत डोरले यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शिवसंग्राम भवन, बीड येथे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेऊन जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी शहरातील जुना बाजार भागातील सामजिक चळवळीतील युवक  अर्जुनजी यादव यांच्या समवेत शाहबाझ शेख, ऋषी कदम, राहुल जगदाळे, निलेश सवासे, नवमन नावाबजादे, हाफिज शेख, तुषार शेंगडे, बाबु जगताप आदी कार्यकत्यांचा प्रवेश करण्यात आला. तेव्हा मेटे साहेबांनी सर्व पदाधिकारी यांना संबोधित करून शुभेच्छा दिल्या व शिवसंग्राम कधीही कठीण काळात सर्वांसोबत आहे असे आश्वासन प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी यांना दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी  आपल्या भावना व्यक्त करून आयुष्यभर शिवसंग्राम संघटना तळागाळातील लोकांपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहील अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसंग्रामचे नेते अनिल घुमरे साहेब, सुहासजी पाटील, विनोदजी कवडे, शेषेराव तांबे, कैलास शेजाळ, सुनिल धायजे, अतुल लांगोरे, अनिरुध्द साळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments