Breaking News

ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही-आ.संदिप क्षीरसगार


बोरफडी-मोहगीरवाडी-लक्ष्मीनगर 2 कोटी 33 लक्ष रूपयाच्या रस्ता कामाचे उद्घाटन 

बीड : बोरफडी आणि परिसरातील जनतेने कायम आमच्यावर प्रेम केल आहे. सर्व साधारण माणसाने सोबत राहत साथ दिली. निवडणुकीच्या विजयानंतर कोरोनाचे संकट ओढावलं त्यामुळे भेटता आलं नाही. या संकट काळातही आपण सामान्य माणसांना आधार देण्यासाठी प्रयत्नशील राहिलोत, कोण काय बोलतं काय टीका करतं यापेक्षा आपण आपला संयम तुटु न देता लोकांची, जनतेची कामे करत आहोत. जनतेची साथ सोबतीला आहे, यापुढे बीड मतदार संघातील रखडलेली विकास कामे पुर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध असून बोरफडी व परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली. 
बोरफडी-मोहगीरवाडी-लक्ष्मीनगर या 2 कोटी 33 लक्ष रूपयाच्या रस्ता कामाचे उद्घाटन झाल्या नंतर ते बोलत होते.
रविवार दि.14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रजिमा 32 ते बोरफडी-मोहगीरवाडी-लक्ष्मीनगर रस्ता सुधारणा या 2 कोटी 33 लक्ष रूपयाच्या कामाचे उद्घाटन आ.संदिप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना अ‍ॅड.डी.बी. बागल म्हणाले की, गेल्या 30 वर्षाच्या काळात जो विकास झाला नाही ती विकास कामे पुर्ण करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर प्रयत्नशिल असतात. कोरोनाचं संकट असतांनाही त्यांनी सामान्य माणसाला मदत करत विविध योजनांच्या माध्यमातून शासनाचा निधी बीड मतदार संघात खेचून आणला आहे. पुढच्या निवडणूकामध्ये कोणी येईल अमिषे दाखवतील त्याला बळी न पडता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि आ.संदिप भैय्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 
यावेळी माजी सय्यद सलीम म्हणाले की, या रस्त्याच्या कामामुळे मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढेही या भागातील आणि मतदार संघातील मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आ.संदिप भैय्या सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावा करत असतात. येत्या काळात नवनवीन शासनाच्या योजना बीड मतदार संघात राबविण्यासाठी ते प्रयत्न करतील, जनतेही सहकार्य करावं, साथ द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर माजी आ.धांडे म्हणाले की, एखादं काम आ.संदिप भैय्यांना संगितले की लगेच ते मार्गी लावतात. अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. यापुढेही आपण संपर्कात राहावं, या भागाचे प्रश्न प्राधान्याने सोडवून असे सांगत आपला आशिर्वाद संदिप भैय्यांच्या सोबत राहु द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी पुढे बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, तुमचा मुलगा म्हणून निवडणुकीमध्ये तुमच्याकडे आलो, ज्या बाबी बोललो त्या पुर्ण करण्यासाठी आता प्रयत्न करत आहे. रस्त्याचा कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याभागासह मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लागुन विकास कामे पुर्ण करायची आहेत. कोण काय बोलतं याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही, संयम तुटु दिला नाही आपले काम आणि जनतेची सेवा मी आणि माझे सहकारी करत आले आहेत. येत्या काळात बीड मतदार संघातील रखडलेला विकास व नव्याने विकास कामे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल. प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करून शासनाच्या नवनवीन योजना बीड मतदार संघात राबवण्यासाठी आणि त्याचा सामान्य माणसापर्यंत लाभ पोहचण्यासाठी जनतेनेही सहकार्य करावं आपल्या भागात विकास कामे होत असतांना त्यावर लक्ष ठेवावं असे सांगत काम गुणवत्ता व दर्जेदार पणे करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला त्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे साळवे, वीर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच हनुमंत कुटे, लालासाहेब घुगे, गोपीनाथ घुगे, नंदु कदम, नितीन कुटे, बिभीषण घुगे, श्रीमंत पनाळे, विक्रम कुटे, कांता जाधव व बोरफडी, मोहगीरवाडी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. 

अचानक कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नका
महावितरणकडून सध्या शेती पंपाचे वीज कनेक्शन कट केल्या जात आहेत. याची पुर्व कल्पना शेतकर्‍यांना दिल्या जात नाही. अशा तक्रारी आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर  यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना चांगलेच खडे बोल सुनावले. शेतकर्‍यांकडे असलेली थकबाकी याबाबत माहिती द्या, शेतकरी जेवढी थकबाकी भरत आहे तेवढी स्विकारा, अचानक वीज कनेक्शन कट करून शेतातील पीकांचे नुकसान करू नका. शेतातील पीके वाया गेल्यास शेतकर्‍याचे मोठे नुकसान होते अशा वेळी महावितरणने थोडी समजूतीची भूमिका घ्यावी असे सांगत आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कानी टाकून शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तातडीने कट केल्या जावू नये यासाठी उर्जा मंत्र्यांना देखिल भेटणार असल्याचे आ.संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. 

गावकर्‍यांनी मागितलं आणि आ.संदिप भैय्यांनी दिलं
मौजे बोरफडी येथे बोरफडी-मोहगीरवाडी-लक्ष्मी नगर या 2 कोटी 33 लक्ष रुपयाच्या रस्ता कामाचे उद्घाटन झाल्यानंतर गावकरी एकत्र बसले होते. रस्ता काम सुरू होणार असल्याने गावकर्‍यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागरांचे आभार मानत गावासाठी सभागृह देण्यात यावं अशी मागणी केली. गावातील जागृत हनुमान देवस्थान याठिकाणी या सभागृहाची मागणी करण्यात आली. आ.संदिप भैय्यांनी टप्प्याटप्प्यात आपले प्रश्न मार्गी लावून असे सांगत सभागृहासाठी 5 लक्ष रुपयाचा निधी जाहिर केला. गावकर्‍यांनी मागणी करताच आ.संदिप भैय्यांनी त्याची पूर्तता केल्याने गावकर्‍यांनी आ.संदिप भैय्यांचे आभार मानले. 
No comments