एसटी महामंडळात कोरोनामुळे प्रशिक्षण थांबवलेल्या चालक तथा वाहक उमेदवारावर उपासमारीची वेळ!
निर्दयी एसटी प्रशासनाने प्रशिक्षण सुरू करून न्याय न दिल्यास उमेदवारांचा उपोषणाचा इशारा!
धामणगाव : सन 2019 मध्ये एसटी महामंडळाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हे व इतर जिल्हे असे मिळून राज्य परिवहन च्या एकूण 21 विभागात सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात क्र.- 1-2019 प्रमाणे4336 व जाहिरात क्र.-2-2019 प्रमाणे 3606 एकूण-7942 हजार चालक तथा वाहक पदासाठी जाहिरात काढून अर्ज मागविण्यात आले होते. यावर हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज करुन लेखी परीक्षा दिल्या,वाहन चाचणी परीक्षा दिल्या
यात गुणवत्ता यादी प्रमाणे उमेदवारांच्या त्या-त्या विभागामध्ये निवडी करून त्यांचे 48,80 दिवसाचे चालक प्रशिक्षण तसेच 15 दिवस वाहक प्रशिक्षण चालू करण्यात आले. व जसे प्रशिक्षण पूर्ण होतील तशा काहींना त्या- त्या डिव्हिजन अंतर्गत असलेल्या डेपोला नियुक्त्या देखील दिल्या परंतु covid-19 मुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन डाऊन मुळे एसटी प्रशासनाने एकाएकी परिपत्रक काढून नवीन लागलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित व सर्व प्रशिक्षण थांबवण्यात यावीत असे आदेशित केले.त्यानंतर पुढे नवीन लागलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पूर्ववत करण्याचे पत्र काढले व त्यांना काम असेल तरच वापरावे असे आदेशित केले.परंतु आता एसटी बर्यापैकी सर्वत्र चालू झालेली असताना देखील पुन्हा थांबवलेले चालक तथा वाहक यांची प्रशिक्षण चालू करण्याचे अध्यापनही आदेश काढले नसून यामुळे विविध डिव्हिजनला प्रशिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. हे सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या संबंधित एसटीच्या डिव्हिजनची उंबरे झिजवत आहेत.त्यांना संबंधित डिव्हिजन मधून आम्हाला आदेश प्राप्त झाला नाही,अमुक नाही,तमुक नाही अशी उत्तरे अधिकारी देत आहे ती ऐकून त्यांना माघारी परतावे लागत आहे.या हजारो बेकार नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना एसटी प्रशासन कधी न्याय देणार?येत्या पंधरा दिवसात परिवहन मंत्री अनिल परब व एसटी प्रशासनाने प्रशिक्षणे चालू करण्याबाबत व डेपोत नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना नियमित ड्युटी देण्याबाबत परिपत्रक न काढल्यास अहमदनगर डिव्हिजन समोर उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष ससाने,सागर आढाव,सागर गायकवाड,संतोष पवार,रोहिदास पालवे,अनिल दुर्गे,सावता कातखडे,संदीप आग्रे,व इतर बीड व अहमदनगर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी दिला आहे.
No comments