Breaking News

कुस्तीगीर परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मुरलीधर मुंडे

बीड  : कुस्तीपटूसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी परळी तालुक्यातील तळेगाव येथील मुरलीधर मुंडे यांची शनिवारी (दि.१३) निवड करण्यात आली आहे.

कुस्तीगीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोविंद चव्हाण यांच्या हस्ते बीडमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र केसरी पुरस्कार प्राप्त शिवाजी केकाण, रौफ शेख, जिल्हा सचिव बाळासाहेब आवारे, सोमा गायकवाड, इसाक शेख, देवकते, विलास जोशी यांची उपस्थिती होती. मुंडे यांच्या निवडीबद्दल कुस्तीगीर परिषदेचे वडवणीचे तालुकाध्यक्ष संजय कसबे, धारूरचे तालुकाध्यक्ष रामेश्वर मुंडे, केजचे तालुकाध्यक्ष मधुकर खाडे, माजलगावचे तालुकाध्यक्ष हनुमान भोसले, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत लोंढाळ, माऊली मुंडे, मुक्तराम कराड, गोविंद मुंडे आदींनी अभिनंदन केले आहे.

कुस्तीपटूच्या प्रश्नांवर ५ वर्षांपासून काम

मुरलीधर मुंडे हे कुस्तीगीर परिषदेचे परळीचे तालुकाध्यक्ष होते. त्यांची तळेगावमध्ये संत भगवान बाबा व्यायामशाळा असून दरवर्षी ते कुस्ती स्पर्धेचे आयोजन करतात. त्यांच्या कामाची दखली घेऊन त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, ते कुस्तीपटुच्या प्रश्नावर गेल्या ५ वर्षांपासून काम करत आहेत.





No comments