राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत मनिषा राठोडने पटकावले कास्य पदक
बीड : ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने व वुशू असोसिएशन ऑफ अमरावती येथे दिनांक १२ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत अमरावती जिल्हा आयोजित १८ वी राज्यस्तरीय सिनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२०-२१ झाली. या स्पर्धेत आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत बीड येथील मनिषा अंकुश राठोड हिने कांस्य पदक पटकावले.
अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे राज्यस्तरीय वुशू स्पर्धा दि. १२ ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान झाल्या. वुशू स्पर्धेत मनिषा राठोड हिने ५६ किलो वजन गटाखाली खेळत अमरावती येथे आपल्या खेळाचे शानदार प्रदर्शन केले. या स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकावले.
तसेच या स्पर्धेत बीड येथील खेळाडू सोमेश्वर मस्के, ओमकार मस्के, उमेश दुधाळ, विनोद मस्के, अक्षय जोजारे, सुहास सुपेकर सहभागी झाले होते. कांस्य पदक विजयी खेळाडू मनिषा राठोड हिला प्रशिक्षक उत्तरेश्वर सपाटे, जालिंदर इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. मनिषा राठोड व सहभागी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन अनिल खराडे, डॉ. नितीन सोनवणे, डॉ. गणेश गुंड, तसेच नातेवाई, प्रशिक्षक, मित्र परिवार, शिक्षक आदींनी त्यांचे अभिनंदन केले. वरील सर्व खेळाडू पुढील स्पर्धेतसाठी जिल्हा क्रीडा संकुल व तुलशी इंग्लिश स्कुल भक्ती कन्स्ट्रक्शन बीड येथे उत्तरेश्वर सपाटे, जालिंदर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते.
No comments