Breaking News

बीड तालुक्यात शेतातील डीपी बंद करण्याचा महावितरणचा धडाका; महावितरणने मनमानी थांबवावी अन्यथा शिवसंग्राम रस्त्यावर उतरेल : सुधीर काकडे


बंद केलेले रोहित्र चालू न केल्यास आंदोलन करण्याचा काकडे यांनी दिला इशारा

बीड : थकीत वीज बीलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने बीड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपला मनमानी कारभार हाकत ही धडक कारवाई सुरू केल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देणे मुश्किल झाले असून बंद केलेले रोहित्र तात्काळ चालू करण्यात येवून महावितरणने आपला मनमानी कारभार थांबवावा, अन्यथा या विरुद्ध शिवसंग्राम रस्त्यावर उतरवून आंदोलन करेल असा, इशारा शिवसंग्रामचे नेते सुधीर काकडे यांनी दिला आहे.  प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की कोरोना महामारीमुळे अगोदरच शेतकरी - शेतमजूर यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कोरोनाच्या नुकसानीतुन शेतकरी सावरतो ना सावरतो तोच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी करोना व अतिवृष्टी या भयंकर संकटात असताना सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी सक्तीची वीज बिल वसुली सुरू केली आहे. त्यातच कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित करणे वीज कनेक्शन तोडणे व डी.पी बंद करणे हा कार्यक्रम मनमानी पद्धतीने अवलंबिलेला आहे. अचानक होणाऱ्या या कारवाईमुळे शेतकरी राजा भांबावलेला आहे महावितरणच्या कार्यालयाची काहीही माहीती नसणारा बळीराजा अचानक झालेल्या या कारवाईमुळे दुखावलेला आहे. शेतातील उभ्या पिकावर  संकट कोसळले आहे.महावितरण मे याबाबत किमान एक महिन्याचा अवधी देऊन ग्रामीण भागात शासकीय योजनेची सविस्तर माहिती देऊन थकित वीज बिल भरून घेणे अपेक्षित होते.परंतु असे न होता सरसकट ग्रामीण भागातून डीपी बंद करण्याचा धडाका महावितरणने लावलेला आहे.

      याबाबतीत शिवसंग्राम चे नेते सुधीर काकडे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांचे दुःख जाणून घेतले.महावितरण कंपनीकडून होणाऱ्या या जुलमी कार्यवाही बाबत जिल्हाधिकारी यांना शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात येणार असून महावितरणने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बंद केलेल्या डि.पी. तात्काळ सुरू कराव्यात अन्यथा शिवसंग्राम पूर्ण ताकतीनिशी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीमहावितरण ने लावलेला आहे
No comments