Breaking News

कृष्णा के देशमुख यांना“ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया” पुरस्कार प्रधान

पुणे : कशीष प्रॉडक्शन्स आणि पुणेकर प्रतू फौंडेशन तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना “ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया” पावर्ड बाय चंदुकाका सराफ अँड सन्स ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा दिमाखदार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, कार्यक्रमात अनेक दिग्गजाचा सत्कार करण्यात आला.

  त्यावेळी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील उमापूर गावचे  भूमिपुत्र  कृष्णा देशमुख हे पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून  सामाजिक कार्य करीत आहेत. आपल्या  लिखाणाच्या माध्यमातून गरीब गरजूवंतना न्याय देण्यासाठी आपली लेखणी झिजवत आहेत. तसेच गरजू रुग्णांना मदत  पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड ,  सोलर प्रकल्पाच्या माध्यमातुन भविष्यात होणाऱ्या वीज टंचाई पासून मुक्ती साठी सोलर पासून वीजनिर्मिती या साठी जनजागृती  या सह  आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य, व खाऊ वाटप करणे.   कोरोना सारख्या जागतिक महामारी मध्ये पोलिसांना  सहकार्य आणि   निःपक्षपाती करत असलेल्या पत्रकारितेची दखल घेऊन  एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून देशात ओळख असणारे  पोलीस आयुक्त  व आयर्न मॅन कृष्ण प्रकाश, यांच्या हस्ते कृष्णा देशमुख यांना ट्रॉफी व शाल श्रीफळ देऊन   ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल  गावकरी व पुणे शहरातील    मित्र मंडळी ने देखील पुरस्कार मिळाला बद्दल अभिनंदन केले आहे 

पुरस्काराला उत्तर देताना कृष्णा देशमुख म्हणाले की, “कोणत्याही क्षेत्रात नाव कमावणे सोपे नसते. यासाठी अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करावे लागते ,तेव्हाच समाज आपली नक्कीच दाखल घेतो त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक काम केले पाहिजे ,या पुरस्काराने जीमेदारी अजून  वाढविली आहे , आणि अजून चागले काम करण्याची क्षमता देखील दिली आहे. 

No comments