Breaking News

अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला


मुद्देमालासह 37 लाखाची विदेशी दारु जप्त,कूमशी शिवारात  राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड : तालुक्यातील कूमशी शिवारात संशयित कंटेनर उभा असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. या कंटेनरची तपासणी केली असता गोवा राज्यातील निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विदेशी दारूच्या साडेपाचशे पेट्याचा 37 लाख रुपयांचा साठा हाती सापडला ही कारवाई बुधवार (दि. 24) रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत साडेपाचशे पेट्या ताब्यात घेण्यात आल्या. ज्यात रियल सेव्हन व्हिस्की ब्रॅंडच्या 750 मिली क्षमतेचे 150 बॉक्स, इंपेरियल ब्ल्यु व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेचे 60 बॉक्स , रॉयल स्टॅग व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेचे 20 बॉक्स, मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेचे 320 बॉक्स अशा विदेशी दारुचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 36 लाख 72 हजार 600 इतकी आहे. तसेच जप्त कंटेनरची किंमत अंदाजे 12 लाख इतकी आहे. कंटेनरच्या चालक विष्णू भागवत कांबिलकर , वय 32 वर्ष, रा. मनकुरवाडी, ता. जि. बीड असे असून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ)(ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

No comments