Breaking News

आधार मल्टीस्टेटला सलग पाचव्यांदा बँक पुरस्कार


माजलगाव : 
माजलगाव आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी ची स्थापना ॲड सुनील सौंदरमल यांच्या प्रेरणेने 2012 पासून माजलगाव शहरांमध्ये कार्यरत आहे संस्थेने अल्पावधीतच महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आधार मल्टिस्टेट हि केवळ तांत्रिक पद्धतीने आर्थिक व्यवहार न करता सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संस्थेने फार मोठे काम केलेले आहे.


या वर्षी लॉक डाऊन मुळे अनेक लोकांना आर्थिक मदत करणे त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस ,डॉक्टर आणि इतर अधिकारी यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन माजलगाव, तेलगाव, अंबाजोगाई, परभणी आणि पुणे शाखेच्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय covid-19 योद्धा  प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्डबॉय, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील प्रमाणपत्र देऊन त्यांचाही आधार मल्टीस्टेट च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्याची दखल घेऊन आधार मल्टीस्टेट ला सलग पाचव्यांदा कर्नाटक मधील मैसूर या शहरांमध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे हा पुरस्कार आमचे सभासद, कर्मचारी, संचालक, ठेवीदार ,कर्जदार आणि ग्राहक यांनी टाकलेल्या विश्वासामुळेच मिळालेला असल्यामुळे हा पुरस्कार  मी त्यांना अर्पण करतो असे आधार मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनील सौंदरमल यांनी सांगितले.


No comments