Breaking News

लाचखोर बीडीओ एसीबीच्या जाळयात ..!

37 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले रंगेहाथ; बीडमध्ये एसीबीची कारवाई

बीड : विहिरीच्या कामाचे बील मंजूर करण्यासाठी 37 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना बीडीओला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा व बीड येथील बीडीओ नारायन मिसाळ यांनी तक्रारदाराकडे विहिरीचे बील मंजूर करण्यासाठी ३७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बुधवारी सायंकाळी मिसाळ यांच्या नगररोड येथील निवासस्थानी ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे उप अधिक्षक बाळकृष्ण हनपुडे व त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

No comments