Breaking News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची फिरंगेश्वरी देवीची याञा रद्द , जामगाव ग्रामस्थांचा निर्णय

आष्टी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सालाबादप्रमाणे मंगळवार दि.2 मार्च रोजी होणारी जामगाव येथील फिरंगेश्वरी देवीची यात्रा रद्द केली असल्याची माहिती सरपंच,उपसरपंच जामगाव ग्रामस्थांनी दिली.

राज्यातील कोरणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच दरवर्षी भाविकांची वाढणारी गर्दी पाहता यंदाची हि याञा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय जामगाव ग्रामस्थांनी घेतला आहे.

फिरंगेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त पुणे,मुंबई सह आदी शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या याञोत्सवानिमित्त जामगाव येथे दाखल होत असतात.दरवर्षी या यात्रा उत्सवानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने देवीच्या मंदिराभोवती आकर्षक अशी विद्युत रोषनाई केली जाते.त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील कुस्तीगीर मल्लांसाठी कुस्तीचा आखाडा गावकऱ्यांच्या वतीने भरवला जातो व सायंकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजीत केले जातात.मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात होणारी हि यात्रा यंदा मात्र रद्द केली असल्याची माहिती जामगाव चे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थ यांनी दिली आहे.

No comments