Breaking News

बसने वृद्ध महिलेस चिरडले


डोक्याची कवटी फुटल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू : केज अंबाजोगाई रोडवरील दुर्देवी घटना
केज : बीडच्या दिशेनेभरधाव वेगाने निघालेल्या शिवशाही बसने एका वृद्ध महिलेस चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज- अंबाजोगाई रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आज दुपारी १: ३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता,की वृद्ध महिलेच्या डोक्याची कवटी फुटली होती. 
मयत काशीबाई रामभाऊ थोरात

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी  अंबाजोगाई हुन बीडकडे भरधाव वेगाने निघालेली शिवशाही बस क्र. (एमएच-०९/ एफएल-१०४२) केज-अंबाजोगाई रोडवरील उपजिल्हा रुग्णालय समोर येताच रस्त्याने चाललेल्या काशीबाई रामभाऊ थोरात (वय ६५)  या वृद्ध महिलेस जोराची धडक दिली. काशीबाई ह्या बसच्या टायरखाली आल्याने त्यांच्या डोक्याची  कवटी फुटून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

No comments